बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा टीमसोबत रवाना झाला नाही, कारण…

मुंबई | 27 नोव्हेंबरपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर तातडीने हा दौरा असून टीम इंडिया ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली आहे. मात्र टीमसोबत रोहित शर्मा रवाना झाला नाहीये. यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात.

टीमची निवड करताना रोहित शर्माला वगळण्यात आलं होतं. मात्र नुकतंच 2 दिवसांपूर्वी त्याचा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. वन डे आणि टी-20 मालिकेसाठी रोहितला विश्रांती देण्यात आलीये. त्यामुळे रोहित काही दिवसांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

सध्या रोहित आपल्या कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे. तिथून तो पुन्हा भारतात येणार आहे. रोहित दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी काही काळ विश्रांती घेणार आहे.

शिवाय बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये तो सराव करणार असून फिटनेस चाचणी पार केल्यावर तो टेस्ट सिरीजआधी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊन संघात दाखल होईल.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेमुळे काँग्रेसला खूप काही ऐकावं लागतंय”

“नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचं पदक देणं”

“तेजस्वीच्या रुपाने देशाला युवा नेता मिळाला, त्यांनी थोडी वाट पाहावी”- शिवसेना

‘तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, ते बिहारचं नेतृत्व करू शकतात’; ‘या’ भाजप नेत्याकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More