रोहितनं केलं ते जगातल्या एकाही फलंदाजाला जमलेलं नाही!

रोहितनं केलं ते जगातल्या एकाही फलंदाजाला जमलेलं नाही!

मोहाली | मोहाली वनडेत रोहित शर्मानं द्विशतक करुन सगळ्या जगाचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतलंय. मात्र रोहित शर्माला जे जमलंय ते जगातील एकाही खेळाडूला जमलेलं नाही. 

रोहितच्या नावे 3 द्विशतकं जमा झाली आहेत. जगात आतापर्यंत फक्त 7 वेळा द्विशतकं ठोकण्यात आली आहेत. त्यातील 3 द्विशतकं एकट्या रोहितच्या नावावर आहेत.

दरम्यान, रोहितशिवाय जी चार द्विशतकं आहेत ती मार्टिन गप्टिल, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहेत. 

आतापर्यंत करण्यात आलेली द्विशतकं-

264- रोहित शर्मा 
237- मार्टिन गप्टिल 
219- विरेंद्र सेहवाग 
215- ख्रिस गेल
209- रोहित शर्मा 
208*- रोहित शर्मा 
200- सचिन तेंडुलकर

Google+ Linkedin