नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली चर्चेत आहे. देशभरात विराट कोहलीचा अनेक चाहता वर्ग आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांनी मैदानात जात विराट कोहलीसोबत सेल्फी घेतली होती. त्यातच आता दोन मुलांनी एका पोस्टरद्वारे विराट कोहलीला भारताचा कर्णधार बनवावं, अशी मागणी करण्यात येत आहे. हे पोस्टर ट्विटरवर व्हायरल होत आहे.
भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या सामन्यांमध्ये भारतीय संघ दमदार पद्धतीने कामगिरी करतोय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ दिवस-रात्र कसोटी सामना खेळत आहे. विराट कोहलीसाठी बंगळुरू हे होम ग्राउंड आहे. त्यामुळे याठिकाणी विराट कोहलीला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
रविवारी दोन मुले बेंगळुरू स्टेडियमवर पोस्टर घेऊन पोहोचली होती. ज्यामध्ये रोहित शर्मा माझा कर्णधार नाही, असे लिहिले होते. तसेच विराट कोहलीला पुन्हा भारताचा कर्णधार बनवा, असंही लिहीलं आहे. मुलांच्या हातातील पोस्टरला त्यांच्या वडिलांनी ट्विट केलं आहे. काही वेळातच हे ट्विट व्हायरल झालं. त्यावर टीका देखील करण्यात येत आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजयी घोडदौड सुरू केली आहे. रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून भारताला एकदाही पराभवाचा सामना करावा लागला नाही. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असल्याने त्याविषयी असे बोलणे योग्य नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
देव तारी त्याला कोण मारी ,मृत्युच्या दाढेतून वाचले महिलेचे प्राण, पाहा व्हिडीओ
‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; नाना पटोलेंच्या नव्या दाव्यानं खळबळ
धक्कादायक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या व्हेरियंटनं टेंशन वाढवलं
“आम्ही बोललो की शरद पवारांचे चमचे आहेत, हे काल पक्षात आलेले…”
‘बॉम्ब कुठं आहे?’ विचारत धनंजय मुंडेंनी थोपटले दंड, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Comments are closed.