Rohit Sharma | रोहित शर्मासाठी गेलं वर्ष चांगलंच खडतर राहिलं. आयसीसी विश्वचषकाच्या (ICC World Cup) संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करुन सुद्धा फक्त फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर तो चांगलाच टेन्शनमध्ये गेला होता, त्यातच मुंबई इंडियन्सनं रोहितला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन हटवलं आणि हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार करण्याची घोषणा केली. या साऱ्या घडामोडी रोहित शर्मासाठी तसेच त्याच्या चाहत्यांसाठी चिंताजनक होत्या, मात्र आता रोहित तसेच त्याच्या चाहत्यांसाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे.
बीसीसीआय रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची शक्यता आहे. स्वतः बीसीसीआयच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या या घटनेची क्रिकेटच्या वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु असून रोहित शर्मावर टाकली जाणारी ही जबाबदारी नेमकी कोणती असा प्रश्न रोहितच्या चाहत्यांना पडला आहे.
कोणती जबाबदारी मिळणार?-
भारताची सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे, त्यानंतर भारतीय संघ अफगानिस्तानविरुद्ध (INDvsAFG) टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे, ही मालिका भारतीय संघासाठी फार महत्त्वाची असून आगामी टी-२० वर्ल्डकपच्या (T20 World Cup) दृष्टीकोनातून या मालिकेला विशेष महत्त्व आलं आहे. आता या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्त्व कोण करणार यावरुन मोठी चर्चा याआधी पहायला मिळाली आहे.
हार्दिक पांड्या ही बीसीसीआयची (BCCI) सर्वात पहिली पसंती होती, अशी माहिती आहे. असं असलं तरी हार्दिक सध्या त्याच्या टाचेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यानंतर ही जबाबदारी दक्षइण आफ्रिकेतील टी-२० मालिकेत संघाची कमान सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) टाकली जाईल, असं सांगितलं जात होतं. मात्र त्यालाही सध्या दुखापतीच्या कारणास्तव संघाच्या बाहेर बसावं लागलं आहे.
रोहित शर्माकडे जाणार कर्णधारपद?
हार्दिक आणि सूर्यकुमार यादव यांच्या दुखापतीबाबत अद्याप कुठलेही अधिकृत अपडेट आलेले नाही, त्यामुळे अफगानिस्तानविरुद्धची मालिका असो की टी-२० वर्ल्डकप, दोघे खेळणार की नाही?, याबद्दल साशंकता आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय जास्त जोखीम घेणार नसल्याची माहिती आहे. आगामी अफगानिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी येत्या एक दोन दिवसात संघ जाहीर होण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताचा सलामीवीर रोहित शर्माकडेच (Rohit Sharma) पुन्हा एकदा टी-२० संघाचं कर्णधारपद जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनीच स्वतः याबद्दल खुलासा केल्याचं कळतंय. “आम्ही रोहित शर्मासोबत चर्चा केली आणि त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं (Team India) नेतृत्त्व करण्यास होकार दिला आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा रोहित शर्माची निवड निश्चित मानली जात आहे.
News Title: Rohit Sharma likely to lead Team India
महत्त्वाच्या बातम्या-
Congress | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सर्वात मोठा धक्का?
Aishwarya Rai च्या ‘या’ चुका ठरू शकतात घटस्फोटाचं कारण!
Kamal Pardeshi | अंबिका मसाला जगभर पोहोचवणाऱ्या कमल परदेशींचं निधन!
Post Office | पोस्टाची जबरदस्त योजना; म्हातारपण जाईल आरामात
Gautami Patil | गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!