बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किंग कोहलीला डच्चू! रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा कर्णधार

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदाचा राजीनामा देणार होता. त्यानंतर भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याकडे भारतीय टी-ट्वेंटी संघांचं संघाचं नेतृत्व देण्यात आलं होतं. अशातच आता भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी देखील रोहित शर्माची वर्णी लागली आहे. (Rohit Sharma new ODI Captain of Team India)

भारतीय वरिष्ठ निवड समितीने पुढे जाणार्‍या एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी संघांचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचं बीसीसीआयने (BCCI) सांगितलं आहे. त्यामुळे आता विराट कोहलीला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला आहे. तर आता उपकर्णधार कोण होणार ?, असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. तर अजिंक्य रहाणे ऐवजी आता रोहित शर्माला आगामी टेस्ट सामन्यांसाठी उपकर्णधार करण्यात आलं आहे.

दरम्यान, विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मो. शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मो. सिराज, या 18 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“खरंच प्रायश्चित्त करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…”

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय; वाचा एका क्लिकवर

बिपीन रावत यांचं निधन, राष्ट्रपतींचा दौरा रद्द तर पंतप्रधान मोदींनी बोलवली महत्त्वाची बैठक

मोठी बातमी! हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन

IAF Helicopter Crash: अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू; आली महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More