ऑस्ट्रेलिया | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झालीये. आज दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताच्या 96 धावांवर दोन विकेट्स गेल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या 338 धावांच्या आव्हानासाठी मैदानावर उतरताना प्रथम रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी उतरली. यावेळी रोहित शर्माला जास्त मोठी धावसंख्या करता आली नाही. मात्र तरीही छोट्या खेळीच्या जोरावर त्याने एका विक्रमाला गवसणी घातलीये.
16 व्या ओव्हरमध्ये रोहितने नॅथन लिऑनच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला. या सिक्ससह त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 100 सिक्स पूर्ण केलेत. टी-20, वन-डे आणि कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 100 सिक्स लगावणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरलाय.
रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन-डेमध्ये 63 सिक्स मारलेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन-डे मध्ये इतके सिक्स कोणत्याच खेळाडूने मारलेले नाहीत.
थोडक्यात बातम्या-
“मला धक्के देण्याची सवय, कधी दुसऱ्याला बसतो तर कधी मलाच”
94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकला!
“डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही”
‘आयुक्त साहेब जरा याचंही उत्तर द्या’; विशाल तांबेंचं आयुक्तांना पत्र
‘…केलं ना तुमचं काम, आता सत्कार कशाला यामुळेच तुम्ही मागं राहता’; अजित पवार भडकले