Top News खेळ

…त्यावेळी मी माझी विकेट द्यायला हवी होती- रोहित शर्मा

दुबई | दिल्ली कॅपिटल्सवर सहजरित्या विजय मिळवत मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल जिंकली आहे. या जेतेपदासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली.

मुंबईची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. मात्र एका शॉर्टवर रोहित व सूर्यकुमार यादव यांच्यात ताळमेळ चुकला. मात्र त्यावेळी रोहित शर्माची विकेट न घालवता सूर्यकुमारने स्वतःला रन आऊट करून घेतलं.

सूर्यकुमार यादवच्या या कार्याबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “या संपूर्ण पर्वात आमच्या बाजूने सर्व गोष्टी घडल्याअसून त्यासाठी मी आनंदी आहे. विजयाची सवय लावून घ्यायला हवी असं मी सुरुवातीपासून म्हणत आलोय.”

“सर्व खेळाडू अविश्वासातील असून आणि त्यांच्याकडून यापेक्षा अधिक मी काही मागूच शकत नाही. सूर्या ज्या फॉर्मामध्ये आहे, ते पाहता मला त्याच्यासाठी विकेट द्यायला हवी होती. त्याच्यासारखी फटकेबाजी या पर्वात कुणीच केली नाहीये.”

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीवर मुंबई भारी; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्राॅफी

‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव यांचा खळबळजनक आरोप

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या