सिडनी | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सिडनीत होणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हिटमॅन रोहित शर्माने संघात पुनरागमन केलं आहे.
या सामन्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी पदार्पण करणार आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत तो वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. मयांक अगरवालला आराम देण्यात आला असून त्याच्याजागी रोहित शर्माची संघात एण्ट्री झाली आहे.
रोहितच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. यामुळे रोहित या तिसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करतो, याकडे टीम इंडियाच्या समर्थकांचं लक्ष असणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे-
अजिंक्य राहणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी (पदार्पण)
थोडक्यात बातम्या-
“गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?”
पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या ‘या’ वाक्यामुळे आजीने संपवलं आयुष्य!
मिर्झापूर फेम गुड्डू भैय्याची लोकप्रियता शिखरावर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
‘औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?’; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल
चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं!