मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहितची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

Rohit Sharma | मुंबई इंडियन्स संघाने पांड्याच्या नेतृत्वामध्ये पहिल्या तिन्ही सामान्यात खास प्रदर्शन केलं नाही. सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांविरोधात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज होते. मात्र आता चौथ्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी करत आयपीएल 2024 मधील पहिला विजय मिळवला. या विजयानंतर रोहितने (Rohit Sharma) एक पोस्ट शेअर केली त्याची सर्वत्र चर्चा आहे.

रोहित शर्माचं ट्वीट

मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियसन्स संघाचा पहिला विजय आहे. या विजयानंतर रोहितने (Rohit Sharma) एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याची आता चर्चा आहे. त्याने पोस्टवर ‘ऑफ द मार्क’ केवळ तीन शब्दांचं कॅप्शन लिहिलं. संपूर्ण ट्वीटमध्येच कुठेच पांड्याचा उल्लेख केला नाही. यामुळे चाहते तर्क-वितर्क लावत आहेत.


रोहितने (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स संघाला तब्बल पाच वेळा आयपीएलचं चॅम्पिअन बनवलं. आयपीएल सुरू होण्याआधीच पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी दिली. यामुळे रोहितला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागलं.

मुंबई इंडिन्सनं विजयाचं खातं खोललं

पहिल्या तीन सामन्यांमध्ये अपमानकारक पराभव स्विकारल्यानंतर चौथा सामना मुंबई विरूद्ध दिल्ली यांच्यामध्ये झाला. हा सामना मुंबईच्या होमग्राऊंड वानखेडेवर झाला. सर्वच खेळाडूंनी चांगली चमक दाखवली. मुंबई इंडियन्स संघानं 234 धावा करत 235 धावांचं टार्गेट दिलं. मुंबईकडून रोहितने 49, इशान किशनने 42 धावा, कर्णधार पांड्याने 39 धावा, टीम डेव्हिडने 45 तर शेपहर्डने 39 धावा केल्या. मुंबईने चांगली कामगिरी केली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्माच्या आयपीएलमध्ये दिल्लीविरोधात 1000 धावा पूर्ण झाल्या. तसेच त्याने महेंद्रसिंह धोनीचा देखील रेकॉर्ड ब्रेक केलाय. रोहितने विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवलं आहे.

रोहित शर्माने या सामन्यामध्ये 3 षटकार आणि 6 चौकार लगावले आहेत. सामन्यामध्ये 180 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. दिल्लीविरूद्ध रोहितने 49 षटकार मारले आहेत. तर धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध 46 षटकार ठोकले. रोहितने महेंद्रसिंहचा धोनीचा रेक़ॉर्ड ब्रेक केलाय.

News title – Rohit Sharma Share Post After Mumbai Indians First Time Win

महत्त्वाच्या बातम्या

हवामान विभागाचा मोठा इशारा ; ‘या’ भागात गारपीटीची शक्यता

‘या’ राशीच्या लोकांचे नातेसंबंध सुधारतील, वाचा राशीभविष्य

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!