रोहितचा तिसरा डबल शतकी धमाका, श्रीलंकेपुढे 392 धावांचा डोंगर

Photo- BCCI

मोहाली | भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वनडेत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा जलवा पहायला मिळाला. रोहितनं 153 चेंडूत 208 धावांची नाबाद खेळी केली. हे त्याचं तिसरं वनडे द्विशतक ठरलं. 

रोहित शर्माला धवननं 68 तर श्रेयस अय्यरनं 88 धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. 50 षटकांमध्ये भारतानं 392 धावा केल्यानं आता श्रीलंकेपुढे मोठं आव्हान आहे. 

दरम्यान, 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेत भारताचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यामुळे या वनडेत भारतासाठी करा किंवा मराची स्थिती आहे.