विश्वचषक जिंकणारा रोहित शर्मा ट्रोल; प्रोफाइल फोटोवरून सुरू झाला नवा वाद

Rohit Sharma | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टी20 विश्वचषकापासून अधिक चर्चेत आला आहे. त्याला वनडे विश्वचषकात जिंकता आलं नाही. मात्र त्याने आपल्या कर्णधार पदाची धुरा सांभाळत आपल्या संघाला टी20 विश्वचषकात विजय मिळवला आहे. अशातच आता रोहित शर्मा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. बार्बाडोसच्या एका स्टेडियमवर रोहित शर्माने भारत देशाचा तिरंगा रोवला. तो फोटो रोहित शर्माने (Rohit Sharma) सोशल मीडियावर प्रोफाईल फोटो ठेवला. त्यावरून आता रोहित शर्मा (Rohit Sharma) ट्रोल झाला आहे.

रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 विश्वचषकात विजय मिळवल्यानंतर बार्बाडोस येथे भारताचा तिरंगा झेंडा रोवला होता. हा क्षण संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट होती. त्याने आपल्या ट्विटर (X) अकाऊंटवर प्रोफाईल पिक ठेवला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तो फोटो पाहताच ट्रोलर्सने रोहित शर्माला सुनावलं आहे. अनेकांनी तिरंग्याचा मान कसा राखायचा याबाबत धडे दिले आहेत.

रोहितच्या प्रोफाईल फोटोमुळे नवीन वाद

रोहित शर्माने (Rohit Sharma) नुकताच त्याच्या सोशल मीडिया X अकाऊंटवरून प्राफाईल पिक बदलला आहे. त्यामुळे अनेकजण रागावले आहेत. रोहितने राष्ट्रध्वजाचा अपमान केला असल्याचा आरोप ट्रोलर्सने केला आहे. टी20 वर्ल्डकपनंतरचा हा व्हिडीओ असून तोच फोटो रोहितने सोशल मीडियाच्या X अकाऊंटच्या प्राफाईलवर अपलोड केला. टीम इंडियाचा देशात असलेला दबदबा असा त्या फोटोमागचा अर्थ असल्याचं रोहित शर्माचं (Rohit Sharma) सांगणं असावं.

परदेशी भूमीवर अशा पद्धतीने भारतीय ध्वज रोवने हे काही नेटकऱ्यांना पचलेलं आणि पटलेलं नाही. यामुळे आता रोहित शर्माला टीकेचा सामना करावा लागत आहे. फोटो पाहिल्यास दिसतंय की, तिरंगा ध्वज हा जमीनीला स्पर्श करत आहे. हा मुद्दा नेटकऱ्यांनी उपस्थित केला आणि चूक दाखवून दिली आहे.

“ध्वजाचा जाणूनबुजून जमिनीला स्पर्श होता कामा नये किंवा तो पाण्यात पडू देऊ नये.” असा  1971 च्या राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा सांगतो.

रोहित शर्मा ट्रोल

एकाने रोहित शर्माच्या फोटोवर ट्रोल केलं. रोहित शर्मा हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. रोहित शर्माने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण खेळ दाखवला आहे. या फोटोत राष्ट्रध्वजाचा अपमान होत आहे. त्याचा काही भाग हा जमिनीला स्पर्श करत आहे. हे दृश्य माझ्या हृदयाला जखम देणारी आहे, अशी पोस्ट एका नेटकऱ्याने केली.

News Title – Rohit Sharma Trolled About New Profile Pic Tiranga Social Media

महत्त्वाच्या बातम्या

“वरळी अपघातातील आरोपीचे मुख्यमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध, आरोपी सुरतला पळाला की गुवाहाटी?”

राज्यात अतिवृष्टीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; बळीराजा पुन्हा हवालदिल

अभिनेत्याची भरपावसात ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांसोबत सेल्फी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

वसंत मोरेंवर उद्धव ठाकरे टाकणार ‘ही’ जबाबदारी?, लवकरच बांधणार शिवबंधन

शरद पवारांनी पहिला उमेदवार केला जाहीर; ‘हा’ 25 वर्षीय तरुण उतरणार रिंगणात