Rohit Sharma | क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आहेत जे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र याबाबत इतर कोणाला फारशी माहिती नसते. यंग जनरेशनमध्ये इशान किशन आणि शुभमन गिल हे दोघजण बेस्ट फ्रेंडच्या यादीत पहिले येतात. त्याचप्रमाणे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल हे चांगले मित्र असल्याचं दिसून आलं आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
सामने खेळत असताना चहल आणि रोहित मस्ती करतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या दोघांची मैत्री पाहून रोहितच्या पत्नीनेच चहलला माझा नवरा चोरून घेऊन गेल्याचं म्हटलंय.
रोहित (Rohit Sharma) कधी चहलला मारताना दिसेल. तर कधी घट्ट मिठी मारताना दिसेल त्यांचे एक सो एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एवढंच नाहीतर युझी हा रोहितला रोहित म्हणून नाहीतर रोहिता म्हणून हाक मारतो.
“माझा नवरा चोर…”
एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) युझी घरी असल्यावर फोन करतो? असा सवाल केला. त्यावर रोहित म्हणाला की, घरी असल्यावर कोणीही फोन करत नाही. आम्ही घरी असल्यावर कुटुंबाला वेळ देतो. मात्र आमची मैत्री तेवढीच घट्ट आहे. दरम्यान रितीकाने रोहितच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी त्या फोटोला “माझा नवरा चोर, माझं कॅप्शन चोर,” असं कॅप्शन दिलं होतं.
देशात आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदावरून चाहते नाराज आहेत. म्हणावी अशी कामगिरी संघ करताना दिसत नाहीयेत. याचा परिणाम हा रोहित शर्माच्या फलंदाजीवर होईल असं वाटलं होतं. मात्र तसं झालं नाही. उलट रोहितने चांगली कामगिरी केलीये.
आय़पीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज रोहित
रोहित यंदाच्या आय़पीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. पॉवरप्लेचा विचार केला तर रोहित इतर संघातून अधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. एखाद दुसऱ्या संघाचे एकूण षटकार देखील एकत्र केले तरीही रोहितच्या षटकारांचा विक्रम मोडता येणार नाही.
News Title – Rohit Sharma Uzi Chahal And Ritika Sajdeh News Update
महत्त्वाच्या बातम्या
‘ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’; अभिनेत्री नोरा फतेहीच्या वक्तव्याने बॅालिवूडमध्ये खळबळ
लोकांची लायकी नाही!, मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ‘या’ कारणामुळे लोकांवर चिडली
अमित शहांच्या सभेआधी मोठा राडा, बच्चू कडू थेट पोलिसांना भिडले
“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”, रोहित पवारांचा उपरोधिक टोला
“मंगळसूत्र कशासाठी?…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत