राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव

सिडनी | टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दिमाखदार शतक झळकावलं. मात्र धोनी वगळता त्याला कुणीच साथ दिली नाही, म्हणून भारताला 34 धावांनी पराभवाला सामोरे जावं लागलं.

ऑस्ट्रेलियाच्या 289 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला सामन्याच्या सुरुवातीलाच जबर धक्के बसले.

ऑस्ट्रेलियाचा जे रिचर्डसन याने 4 बळी टिपले आणि जेसन बेहनडॉफ याने 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.

दरम्यान, निर्धारित 50 षटकांमध्ये 254-9 धावांवर भारताला रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं.

महत्वाच्या बातम्या-

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार