बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब ! रोहित शर्माच्या विकेटसाठी ‘टीम साऊथी’ने … ; शेन जर्गेसनचा मोठा खुलासा

नवी दिल्ली | भारत आणि न्युझीलंडमधील अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटचा पहिल्या विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने भारताला 8 गड्यांनी पराभूत केलं आहे. कर्णधार केन विल्यमन्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने सामना जिंकला असला तरी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली आहेत. यातच न्यूझीलंडच्या गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेसनने मोठं गुपितं उघड केलं आहे.

माझ्या मते, रोहितच्या विकेटसाठी टिम बऱ्याच दिवसांपासून काही गोष्टींवर काम करत होती. टीम साऊथी नेहमी गोलंदाजी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची सुरुवात मे मध्ये लिंकनमधील आमच्या शिबिराच्या दरम्यान झाली. रोहित शर्माच्या विकेटसाठी त्यावेळी साऊथी इनस्विंगवर काम करत होता. चेंडू एखाद्या आऊटस्विंगर सारखा पडत होता. परंतु, तो इनस्विंग करत होता. त्यामुळे त्याला त्याच्या गोलंदाजी करताना चालू स्पीडपेक्षा जास्त स्पीड मिळाला आणि याच इनस्विंगवर त्याला रोहित शर्माची विकेट मिळाली, असं शेन जर्गेसन यांनी सांगितलं आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची हवा काढली. एकामागोमाग एक फलंदाज बाद झाले. त्यात सुरूवातीची सलामी फलंदाजांची विकेट महत्वाची होती.  थ्री क्वार्टर सीम बॉलवर युवा फलंदाज फलंदाज शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माची विकेट न्यूझीलंडसाठी महत्वाची होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमी गोलंदाज जो बाॅल टाकतात तो बाॅल टीम साऊथीने रोहित शर्माला टाकला.

आऊटसाईड लाईनच्या बाजूच्या पट्टीत बाॅल टाकून तो आऊटस्विंगर सारखा टाकून तो बाॅल इनस्विंग करायचा. तो बाॅल त्यामुळे खाली राहतो. आणि फलंदाजाला वाटतं. बाॅल बाहेर जाईल. मात्र, तो चेंडू कमी उसळी मारत स्टंपच्या दिशेने जातो. त्यावर फलंदाज एकतर बोल्ट होतो किंवा एलबीडब्लु तरी होतो. अश्याच बाॅलचा सराव टीम साऊथीने केला होता आणि त्याच एका चेंडूवर साऊथीला रोहित शर्माची विकेट मिळाली.

थोडक्यात बातम्या-

‘सुप्रिया ताईंचा ईडीवर पक्का विश्वास आहे’; भाजपची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

एका महिन्यात 16 वेळा इंधन दरवाढ; इंधनदरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘युज अँड थ्रो’ची भूमिका – एकनाथ खडसे

पोटनिवडणुकांबाबत ठाकरे सरकारचा निर्णय पक्का; थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More