मनोरंजन

रोहित शेट्टीने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून आश्चर्यचकित व्हाल!

मुंबई |  दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अ‌ॅक्शन सीन्ससाठी लोकप्रिय आहे.  अ‌ॅक्शन सीन दाखवणारा रोहित शेट्टी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही गाड्यांसाठी वेडा आहे. नुकतीच रोहितने नवीन कार खरेदी केली आहे.

रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीसोबतचा एक फोटो शेअर केला. ही पिवळ्या रंगाची Lamborghini Urus आहे.  या Lamborghini Urus ची किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे.

भारतातील काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे ही कार आहे. आता या Lamborghini Urus असणाऱ्या भारतीयांमध्ये रोहित शेट्टीचा समावेश झाला आहे. रोहितने ही नवी लक्झरी कार स्वत:साठी विकत घेतली असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, रोहित शेट्टीकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यामध्ये फोर्ड, रेंज रोवर अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आता Lamborghini Urus  या गाडीची देखील भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या