मुंबई | दिग्दर्शक रोहित शेट्टीने ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या कमाईतील 51 लाख रुपये मुंबई पोलीस कल्याण निधीसाठी दिले आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपट पाचव्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे.
पोलिसांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उमंग’ या कार्यक्रमात रोहित आवर्जून उपस्थित होता. त्याच कार्यक्रमादरम्यान त्याने ही घोषणा केली.
रोहित शेट्टी, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण यांनी ‘रोहित शेट्टी पिक्चर्स’ या ‘सिम्बा’ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या वतीने मुंबई पोलिसांना 51 लाखांचा चेक देऊ केला आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘उमंग’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मोठमोठ्या बाॅलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती.
महत्वाच्या बातम्या-
-“राहुलजी, आजाराशी संघर्ष करणाऱ्याविषयी खोटं बोलण्याइतके तुम्ही असंवेदनशील”
-भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन
-धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत निघाला साप
-महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?, हालचालींना वेग
-धक्कादायक! SBI च्या निष्काळजीपणामुळे लाखो ग्राहकांची महत्वाची माहिती लीक!