अहमदनगर | दिल्लीमध्ये सुरु असलेलं आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जोरदार समाचार घेतला आहे.
विरोधी पक्षातले लोक नुसतेच वक्तव्य करतात त्याला काही आधार नसतो, असा टोला रोहित पवारांनी रावसाहेब दानवेंना यांना लगावला आहे. ते कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत आहेत, जर त्याला तुम्ही भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून काही जण येऊन या लोकांना प्रेरित करतात, असं म्हणत असाल, तर तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देता, असं म्हणत रोहित पवारांनी रावसाहेब दानवें टीकास्त्र सोडलंय.
सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिलाय.
थोडक्यात बातम्या-
“भाजपला बुडवण्यास रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार”
“नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प”
शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी?
रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे- रघुनाथदादा पाटील
नीता आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा; अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन