बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

मुंबई | सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यावरून राज्यातील ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तसेच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाह, असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर तोफ डागली. यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. रोहिणी खडसे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता…? आता गळा काढण्यात अर्थ नाही, अशी टीका रोहिणी खडसे यांनी फडणवीसांवर आणि भाजप नेत्यांवर केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्यांसोबत मनसे आमदार मैदानात

बैठक भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची, चर्चा मात्र अजित पवारांची!

“महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय”

‘फक्त 2 औषधं घेतली आणि कोरोना बरा झाला’; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा दावा

“आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More