Top News

सरकार टिकवण्यात अजित पवारांची भूमिका महत्वाची असेल- संजय राऊत

मुंबई | ज्यांनी 80 तासांचे सरकार बनवले त्यांना आजूनही वाटतंय की उद्धव ठाकरेंचं सरकार 80 दिवसही टीकणार नाही. पण या भ्रमातून आता सगळ्यांनी बाहेर यावं, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तील रोखठोकमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

सरकार नागपूरात पोहचलं आहे. मुंबईत येऊन संपूर्ण मंत्रिमंडळ बनेल आणि नंतर 5 वर्षे टीकेल. सरकार टीकवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची भूमिका महत्वाची राहील, काळजी नसावी, असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचे दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर होतील असं वातावरण आहे. सोमवारपासून नागपूरचे विधानसभा अधिवेशन सुरू होईल. अनेकदा हे अधिवेशन एक-दोन आठवडेच चालते, पण त्यासाठी संपूर्ण सरकार लवाजमा घेऊन नागपुरात उतरते आणि ते बऱ्याचदा रात्रीच्या रंगीत हुरडा पाट्यातच मग्न असते. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा वातावरणात फार रमणारे नाहीत, असं राऊत म्हणाले आहेत.

80 तासांचे सरकार ज्यांनी आणले आणि पडले त्यांना असे वाटते की, हे सरकार 80 दिवसही टिकणार नाही. नागपूरचे अधिवेशन हे राजकीय घोडेबाजारासाठी प्रसिद्ध, पण 170 सदस्यांचे भक्कम बहुमत असलेले हे सरकार पाच वर्षे टिकेल.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची ही भूमिकाअसल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या अधिवेशनानंतर होईल आणि हे राज्य वेगाने पुढे जाईल. महाराष्ट्रात जे घडले ते अनपेक्षित होते. असे घडले आहे यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नसल्याचंही संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या