Top News खेळ विदेश

फूटबॉलपटू रोनाल्डोने विकत घेतली जगातील सगळ्यात महागडी गाडी, किंमत ऐकून हादरून जाल..!

नवी दिल्ली | संपूर्ण जगात ख्रिस्तियानो रोनाल्डो माहित नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. फुटबॉलच नाव घेतलं की, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनाल मेस्सी हे दोन नावे हमखास येतातच. काही वेळा त्यांचा खेळ पाहून असं वाटत की हे फुटबॉल खेळतात की, फुटबॉल यांच्यासाठी खेळतोय, कदाचित हे गणितही त्यांनाच ठाऊक असेल..!

पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने जगातील बुगाटी सेंटोडीएसी (Bugatti Centodieci) ही सर्वात महागडी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल ७५ कोटी रुपये आहे. रोनाल्डो ज्या फुटबॉल क्लबबरोबर खेळतोय, त्यांनी नुकतीच ३६ वे पर्व असलेले Serie A या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकल्यावर त्याने ही गाडी खरेदी केली आहे.

रोनाल्डोने ही गाडी खरेदी केली आहे, त्या कंपनीने फक्त १० गाड्याच बनवल्या आहेत. रोनाल्डोने ही माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर खात्यावरून दिली आहे. रोनाल्डोकडे जेवढ्या गाड्या आहेत, त्या सर्व गाड्यांची किंमत ५०-१०० कोटी नाही तर तब्बल २६४ कोटीपेक्षाही जास्त आहे.

Bugatti Centodieci ही गाडी ३८० किमी प्रति तास वेग पकडते. २.४ सेकंदात ही गाडी ६० किमी प्रति तास वेग पडकते. रोनाल्डोला या गाडीसाठी २०२१ हे नवीन वर्ष येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. स्पोर्ट्सवेअर ब्रँड बुगाटी आणि ऑटोमोबाईल ब्रँड नाईकी यांनी मिळून रोनाल्डोसाठी एक विशिष्ट बूट बनवला आहे. ‘Mercurial Superfly VII CR7’ या बूटचे नाव असून रोनाल्डोच्या वेगाची आवड तसेच प्रतिष्ठित आणि वेगवान बुगाटी गाड्यांची आवड असल्यामुळे त्यांनी या प्रेरणेने हा बूट बनवला आहे.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या