Top News पुणे महाराष्ट्र

‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

पुणे |  पुण्यातील महंमदवाडीत एका तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी 7 फेब्रुवारी रोजी महंमदवाडीतील ए वन पार्कच्या उच्चभ्रू सोसायटीमधील 22 वर्षीय पूजा चव्हाण हिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन आत्महत्या केली. पूजाचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. यातूनच हा सगळा प्रकार घडला असल्याचं स्थानिक लोक बोलत आहेत.

पूजाने मध्यरात्रीच्या सूमारास अचानक इमारतीवरुन उडी मारल्यानं ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

दरम्यान,  या प्रकरणासंदर्भात वानवडी पोलिसांनी नोंद घेतली असून, आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”

…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!

अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप!

‘शरद पवार सुधारणांच्या बाजूने, मात्र…’; संसदेत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

…म्हणून पोलिसांनी चक्क कोंबड्यांनाच पोलीस कोठडीत डांबलं!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या