बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Royal Enfield च्या शौकिनांना धक्का, कंपनीने केली गाडीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या किंमत!

नवी दिल्ली | कोरोना महामारीचा फटका देशातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांना बसला आहे. अशातच आता Royal Enfield  कंपनीने मोटारसायकलच्या किंमतीत वाढ केल्यामुळे ग्राहकांना जोरदार झटका बसला आहे. या कंपनीने जुलै महिन्यात वाढ केल्यानंतर लगचेच काही महिन्यानंतर मोटार सायकलच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केली आहे.

जानेवारी, एप्रिल आणि जुलैमध्ये रेट्रो-मॉडर्न बाईक निर्माता Royal Enfield  ने मोटार सायकलच्या किंमतीत वाढ केली होती. आज Royal Enfield ने काही मोटारसायकलच्या किंमतीत वाढ केली आहे. Royal Enfield च्या Meteor 350 च्या किंमतीत 7000 रूपये तर एनफील्ड हिमालयन एडीव्हीच्या किंमतीत 5000 रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे Meteor 350 ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 99 हजार 109 रूपये तर हिमालयन एडीव्हीची किंमत  2 लाख 10 हजार 784 रूपये इतकी झाली आहे.

Royal Enfield च्या Meteor 350 च्या मालिकेमधील बेस फायरबॉलची किंमत 1.99 लाख आहेत. तर मिड स्टेलर मोटार सायकलची सध्या किंमत 2.05 लाख तर सुपरनोव्हा 2.15 लाख किंमत आहे. तर हिमालयन मालिकेतील सिल्वर, ग्रे ची किंमत 2.10 लाख, तर ब्लू रेड ची किंमत 2.14 लाख आणि ब्लॅक ग्रीन मधील 2.18 लाख इतकी किंमत झाली आहे.

दरम्यान, नवीन Royal Enfield  मधील Meteor 350 मध्ये कंपनीने 349 सीसी इंजीन एअर-ऑइल, कुल्ड एसओएचसी इंजिन दिलं आहे. हे इंजिन 6 हजार 100 आरपीेएमवर 20.2 बीेएचपी पॉवर आणि 4 हजार आरपीएमवर 27 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स आहेत. हिमालयन मध्ये 444 सीसी एअर कुल्ड इंजिन आणि हे इंजिन 6 हजार 500 आरपीएमवर 24.3 बीएचपी पॉवर तर 4 हजार 32 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.

थोडक्यात बातम्या- 

‘या घटनेवर राजकारण करणं म्हणजे मृत्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’; संजय राऊत विरोधकांवर संतापले

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे तरुणावर तक्रार दाखल

दिल्लीतील पावसाने मोडले सर्व रेकॉर्ड; दिल्लीचं विमानतळ पाण्यात

खोकल्यानंतर मोबाईल अ‌ॅप सांगणार कोणता आजार झालाय; जाणून घ्या अधिक माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More