तंत्रज्ञान देश

लॉकडाऊनमध्ये रॉयल एनफील्डची कमाल, ग्राहकांच्या पसंतीला बुलेटची धमाल…!

मुंबई | आपल्याकडे एखादी बुलेट असावी, असं प्रत्येकाला नेहमी वाटतं. त्या गाडीची मज्जा काही वेगळीच आहे. जगात कोरोनाने सर्व काही ठप्प असताना बुलेट गाडीची आवड अजूनही लोकांमध्ये टिकून आहे. रॉयल एनफील्डने २०२० मध्ये जून महिन्यात ३८,०६५ गाड्यांची विक्री केली पण त्या तुलनेत मागच्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये ४०,३३४ गाड्यांची विक्री करण्यात ते यशस्वी झाले आहेत.

रॉयल एनफील्डने २०१९ मध्ये जुलै महिन्यात ४९,१८२ गाड्यांची विक्री केली होती, पण २०२० मध्ये ३७,९२५ गाड्यांची विक्री झाली. मागच्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत २३ टक्क्यांनी घट झाली आहे. निर्यातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या वर्षी याच महिन्यात ५,००३ गाड्या बाहेर देशात पाठवल्या होत्या, पण ह्या वेळी फक्त २,४०९ गाड्या बाहेर देशात पाठवता आल्या. इथेही ५२ टक्क्यांनी घट झाली आहे.

भारतात आणि बाहेर देशात असं दोन्ही मिळून रॉयल एनफील्डने या वेळी ४०,३३४ गाड्यांची विक्री झाली, पण मागच्या वर्षी ५४,१८५ गाड्यांची विक्री केली होती. इथेही २६ टक्क्यांनी झाली आहे.

भारतात टाळेबंदी असतानाही कंपनी गाड्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या कोरोना संकटात एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत ९२,८६२ गाड्यांची विक्री करू शकले पण मागच्या वर्षी २,२३,६१२ गाड्यांची विक्री केली होती. यातही ५८ टक्क्यांनी घट झाली आहे. याच दरम्यान १४,२८२ गाड्या बाहेर देशात पाठवल्या होत्या, पण या वर्षी ते हा आकडा कमी होऊन ४,७३९ वर आला आहे. या वर्षी एप्रिल आणि जुलै महिन्यामध्ये ९७,६०१ गाड्या बाहेर देशात पाठवल्या आणि २०१९ मध्ये हाच आकडा २,३७,८९४ होता. यातही ५९ टक्क्यांनी घट झालेली दिसून आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात नवं नाट्य, तपासासाठी आलेले पाटण्याचे SP….

खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, कुटुंबातील तब्बल 7 जणांना कोरोनाची लागण

“सत्ता गेल्याने ह्यांची डोकी कामातून गेली आहेत, फडणवीस तुम्ही दिल्लीली जा अन्…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या