बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Royal Enfield च्या नव्या बाईकचा जलवा; 2 मिनिटांत विकल्या गेल्या सर्व बाईक

नवी दिल्ली | रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) बाईकला आपल्याकडे खूप मागणी आहे. लहान मुलं ते मोठी माणसं सर्वच वयोगटातील व्यक्तिंना रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाईकचं वेगळंच क्रेझ आहे. तर कंपनीने नुकतीच त्यांची एक खास नवीन बाईक लाँच केली आहे.

रॉयल एनफिल्ड कंपनीने त्यांची ‘650 Twin Anniversary Edition’ ही बाईक लाँच केली आहे. संपूर्ण जगासाठी कंपनीने या बाईकचे 480 युनीटच बनवले आहेत. तर भारतीय बाजारपेठेसाठी केवळ 120 युनिट्स सादर करण्यात आले होते.

कंपनीने 6 डिसेंबर रोजी गाडीचं बुकिंग सुरू केलं. या नवीन गाडीचं बुकिंग सुरू होताच अवघ्या 2 मिनिटात सर्वच गाड्या बुक झाल्या आणि बघता बघता सोल्ड आऊटचा (Sold Out) बोर्ड लागला. कंपनीला 120 वर्षे पूर्ण झाल्याने ही स्पेशल एडिशन लाँच करण्यात आली आहे.

कंपनीच्या इतर बाईक्सप्रमाणे या बाईकमध्येही 650ccचं इंजिन आहे.तर रीच ब्लॅक क्रोम पेंट थीममध्ये ही बाईक लाँच करण्यात आली आहे. हाताने बनवलेला ब्रास बॅज देखील कंपनीने टाकीवर लावला आहे. (Royal Enfield Anniversary Edition Bike Sold out In Just 2 Minutes)

थोडक्यात बातम्या-

“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

‘..अन्यथा रस्त्यावर फिरकूही देणार नाही’; पडळकर कडाडले

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More