बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फलटणमधून अंडरवर्ल्ड डाॅन छोट्या राजनच्या भावाला रिपाईने उमेदवारी केली जाहीर!

सातारा |  शिवसेना-भाजप युतीचा घटक असलेल्या रिपब्लिकन पक्षाने ‘अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजन’चा भाऊ दिपक  निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी जाहीर केली आहे. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांना चेंबूरची जागा सोडण्यासाठी शिवसेनेने नकार दिला म्हणून त्यांना फलटणमधून लढावं लागतयं.

रिपाइंने निकाळजे यांना तिकीट दिल्यावर भाजप गुंडांना निवडणुकीत उतरवतंय तसेच याआधी मोदींनी गुजरातमधून माफिया पुरुषोत्तम सोलंकी यांना निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यांना आपल्या सरकारमध्ये मंत्री केलं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

मराठवाड्यातील नायगावमधून राजेश पवार, परभणीतल्या पाथरीमधून मोहन फड तर मानखुर्द-शिवाजीनगर आणि फलटणमधून अनुक्रमे गौतम सोनवणे आणि दिपक निकाळजे यांना रिपाइंने उमेदवारी जाहीर केली आहे.

रिपब्लिकन पक्षाला विधानसभेसाठी सहा जागा देण्यात आल्या आहेत. त्यातल्या चार उमेदवारांची नावे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. माळशिरस आणि भंडारा येथील नावे लवकरचं जाहीर करू असं त्यांनी सांगितलयं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More