महाराष्ट्र मुंबई

अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार- रामदास आठवले

मुंबई | अयोध्येत 30 एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार असल्याचं खासदार आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. यासाठी आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांची भेट घेणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं आहे.

रामदास आठवले यांनी आपण स्वत: मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. “राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर मी जमीन पाहण्यासाठी जाणार आहे. चांगली जागा घेऊन तिथे बौद्धविहार बांधण्याचा माझा प्रयत्न आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

गायक आनंद शिंदे यांनी अयोध्येत बौद्धविहार करण्याची मागणी केली आहे. रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या आधीपासूनच आपण यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, आनंद शिंदे प्रसिद्ध गायक असून माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. आनंद शिंदेनी अयोध्येत बौद्धविहार उभारण्याची मागणी केली आहे. मी गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने ही मागणी करत आहे. अयोध्येत बौद्ध मंदिर व्हावं यासाठी फार आधीपासून माझ्या हालचाली सुरु आहेत. सरकारकडून जागा मिळाली तर ठीक आहे. पण सरकारकडून जागा मिळत नसेल तर तिथे एका ट्रस्टची स्थापन करुन 30 एकर जागा खरेदी करणार, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले…

हार्दिक पांड्या झाला बाबा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला इशारा, म्हणाल्या…

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिवसेना नगरसेवक फोडले; सिन्नरमध्ये ‘पारनेर’ची पुनरावृत्ती!

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस लाखमोलाची मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या