Loading...

माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

मुंबई | माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. सध्या ते कोल्हापुरातील करवीर विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत.

Loading...

महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील पोलिस आयुक्त मिंलिद खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे सहाय्यक कमांडंट हरिश्चंद्र काळे यांना राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात येणार्‍या उत्कृष्ट गुन्ह्यांच्या तपास पदकांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. देशात विविध तपास यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या 96 जणांना हे पदक देण्यात येणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

Loading...

-पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

-कलम 370 रद्द करण्याला जे विरोध करतात त्यांची यादी बनवा अन्…- नरेंद्र मोदी

-पूरग्रस्त लोकांचं दु:ख पाहून शर्मिला ठाकरेंना रडू कोसळलं…!

-पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू- चंद्रकांत पाटील

Loading...