बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर. आर. पाटलांच्या बंधूंचा आईसोबतच्या व्हायरल फोटोमागील कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

कोल्हापूर | कोल्हापूरच्या करवीरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील आज आपल्या पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. राजाराम पाटील हे राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सख्खे बंधू आहेत.

राजाराम पाटील यांचा आपल्या आईस सलाम करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाटील आपल्या पोलीस सेवेच्या शेवटच्या दिवशी जाताना आपल्या आईला सलाम करत आहेत. त्यांच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. आर आर आबांचा मुलगा रोहीत पाटीलने सोशल मीडीयावर पोस्ट शेअर केली आहे.

राजाराम पाटील हे तात्या म्हणून सर्वत्र परिचीत आहेत. राजाराम पाटील यांचा भाऊ राज्याचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री होता, त्यांच्या वहिनी आमदार आहेत. घरात मोठा राजकीय वारसा असताना देखील कधीही आपल्या पोलीस सेेवेत पाटील यांनी बडेजाव केला नाही. आपल्या साध्या सरळ आणि कामावरील निष्ठेसाठी त्यांची पोलीस दलात ख्याती आहे.

दरम्यान, राजाराम पाटील यांना आपल्या पोलीस सेवेतील कामगिरीसाठी दोनवेळेस राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपाची तक्रारीचं प्रकरण पाटील यांनी अतिशय चोखपणे पार पाडलं होतं.

थोडक्यात बातम्या –

“भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 कोटीचे मालक झालेच कसे?”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करणार हे आता पाहावं लागेल”

“महाराष्ट्राची जनता अनाथ झाली की काय, त्यांचं कोणीच वाली नाही का?”

‘मीच तो सर्वज्ञ’ फडणवीसांच्या अशा स्वभावामुळे राज्यावर संकट आलं- रूपाली चाकणकर

‘दोन जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी आम्हाला…’; मनसे-भाजप युतीबाबत नानांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More