रेल्वे विभागात नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Job Update l रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) उत्तर रेल्वेने ट्रेड अप्रेंटिसशिपच्या 4096 रिक्त पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच या भरतीसाठी अर्जाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, 10वी/ITI उत्तीर्ण उमेदवार 16 ऑगस्ट 2024 पासून उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतील. इच्छुक उमेदवार 16 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात.

पात्रता आणि निकष काय आहेत? :

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यासोबत उमेदवाराने ITI प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. उमेदवाराचे किमान वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. रेल्वेच्या नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. मात्र 16 सप्टेंबर 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि rrcnr.org भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला प्रथम आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर उमेदवारांनी इतर तपशील, स्वाक्षरी, फोटो इत्यादी अपलोड करावे लागतील. यानंतर शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा लागेल.

Job Update l अर्ज शुल्क किती आहे? :

या भरतीमध्ये फॉर्म भरण्यासोबतच जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच SC, ST आणि महिला उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी विनामूल्य अर्ज करू शकतात.

या भरतीची विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला बसण्याची गरज नाही. 10वी आणि ITI डिप्लोमा गुणांच्या आधारे सिलेक्शन केले जाणार आहे. तसेच दोघांच्या गुणांना समान महत्त्व दिले जाणार आहे. म्हणजेच गुणवत्तेसाठी 50 टक्के वेटेज 10वीच्या गुणांना आणि 50 टक्के वेटेज आयटीआय डिप्लोमाच्या गुणांना दिले जाणार आहे.

News Title- RRC NR Recruitment 2024

महत्वाच्या बातम्या-

सुप्रियाच्या लाडक्या भावाने रंग बदलला, आता ते पिंक झाले

‘कांतारा’ ते KGF…70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत साउथ इंडस्ट्रीची बाजी; पाहा विजेत्यांची यादी

‘देवाची नव्हे तर नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!’ अजित पवारांचं वक्तव्य

‘आर्ची’ फेम रिंकू राजगुरूला मिळाला रियल लाईफ ‘परशा’?; म्हणाली, “माझ्या आयुष्यात.. “

गौतम अदानींसाठी सुजय विखे झाले ड्रायव्हर, व्हिडीओ व्हायरल