मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांंच्या मंत्रिपदावर शंका घेत शिवसेनेवर टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
तुमच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळं तर तुम्ही ‘अनुभवावर’ बोलत नाहीत ना?, असं म्हणत रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील, अनुभवापेक्षा आदित्य ठाकरे यांचं काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता असं मला वाटतं, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, कोणताही अनुभव नसाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. त्यावर रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत पाटलांना उत्तर दिलं.
.@ChDadaPatil अनुभवापेक्षा @AUThackeray जी यांचं काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता, असं मला वाटतं.
तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळं तर तुम्ही ‘अनुभवावर’ बोलत नाहीत ना?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय”
औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंचा विरोध
महत्वाच्या बातम्या-
“भाजप सरकार घालवण्याची जबाबदारी काँग्रेसलाच पार पाडावी लागेल”
…तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करू- देवेंद्र फडणवीस
“पंतप्रधान कार्यालयातील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात”
Comments are closed.