बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न”, मुख्यमंत्र्यांची मृतांच्या वारसांना प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची मदत

मुंबई | नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे, अशा शब्दांत  उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“…म्हणून शेवटचा पर्याय म्हणून लाॅकडाऊनचा विचार करावा लागतोय”- राजेश टोपे

“नाशिकच्या ऑक्सिजन गळतीमधील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार मदत”

एकाच विमानात 53 कोरोनारुग्ण आढळल्याने ‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

कोरोनापासून बचावासाठी WHO ने जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना!

देशासाठी कायपण! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रतन टाटांनी उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More