बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मतदारसंघातील कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना 50 हजार रुपये देणार’; ‘या’ नेत्याची घोषणा

बंगळुरू | कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दुसर्‍या लाटेमुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अनेक लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. या कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशात कर्नाटकातील मंत्री बी सी पाटील यांनी हिरेकेरुर मतदारसंघातील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

बी सी पाटील यांनी कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बीसी पाटील हिरेकेरून मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बीसी पाटील यांच्याकडे कृषी राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बीसी पाटील आपल्या खिशातून ही मदत करणार आहेत.

कोरोनामुळे अनेक पालकांचा जीव जात असल्याने लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत मध्य प्रदेश सरकारनं अनाथ मुलांना प्रति महिना 5 हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. या मुलांची मोफत शिक्षणाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे. मध्ये प्रदेश सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी भयानक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचे नवे स्ट्रेन आढळून येत असल्यामुळे चिंता वाढली आहे.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी, पाहाल तर हैराण व्हाल

‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणून…’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप

रिक्षातून कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न, चालकासोबत घडला खतरनाक प्रकार, पाहा व्हिडीओ

कोरोनाचे नियम धाब्यावर; पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली

दिलासादायक बातमी! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More