बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ; लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संक्रमण

नवी दिल्ली | अमेरिकेत गेल्या वर्षी कोरोनाने धुमाकूळ घातला होता. जगातील सर्वात मोठी आरोग्य यंत्रणा असलेल्या अमेरिकेत बेडची कमतरता जाणवत होती. त्यानंतर रूग्णसंख्या नियंत्रणात आली. अमेरिकन सरकारने लसीकरणावर भर दिला आणि आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र आता अमेरिकेत आणखी एका व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अमेरिकेत गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता दिसतीय.

रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस (RSV) असं या व्हायरसचं नाव आहे. कोरोनापेक्षा अधिक वेगाने हा व्हायरस पसरत असल्याचं समोर येतंय. अमेरिकन माध्यमांकडून समोर आलेल्या वृत्तानुसार लहान मुलांना या व्हायरसचं मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. जून महिन्यापासून अमेरिकेत रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली. गेल्या दोन महिन्यातच या RS व्हायरसने अमेेरिकेतील अनेक लहान मुलांना संक्रमित केलंय.

अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यात कोरोना संक्रमण 148 टक्क्यांनी वाढलं आहे. तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा दर 73 टक्क्यांनी वाढला आहे. या दोन्ही व्हायरसचं संक्रमण वेगानं पसरत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दोन्ही व्हायरसचा सामना करताना रूग्णालयातील बेड आणि आरोग्य कर्मचारी कमी पडतील, अशी शक्यता आता अमेरिकेच्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

दरम्यान, नाकातून पाणी वाहू लागणं, खोकला, शिंका आणि ताप ही RS व्हायरसची प्रमुख लक्षणं आहेत. अमेरिकेत लहान मुलं, लहान बाळ त्याचबरोबर आता तरूणांना देखील संक्रमण होऊ लागलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लहान मुलं रूग्णालयात दाखल होत आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?; केंद्रीय पथक तातडीने पुण्यात दाखल

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शिवसेनेला मोठा धक्का! तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More