रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार

बीड |  रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच फिर्याद दाखल केली आहे. शारीरिक, मानसिक छळ करत असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने म्हणजेच सुदामती गुट्टे यांनी त्यांच्याविरोधात दिली आहे.

रत्नाकर गुट्टे यांंच्यासह इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत.

रात्री-अपरात्री परस्त्रीयांना घरी घेऊन येतात, मला घराबाहेर काढण्याची धमकी देतात, असं त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल

-काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी

-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच!

-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू!- काँग्रेस

-…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो!