नागपूर महाराष्ट्र

एक्झिट पोलचे कल आले… संघ-भाजपच्या भेटीगाटी सुरु झाल्या!

नागपूर | निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी आज(सोमवार) नितीन गडकरींची भेट घेतली आहे.

नितीन गडकरी आणि माझी भेट ही केवळ औपचारीक भेट असून या भेटीत कोणतीही राजकिय चर्चा झालेली नाही, असं भैय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे.

विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये बहुतांश एक्झिट पोलचे निकाल भाजपच्या बाजुने लागले आहेत. त्यामुळे संघाच्या आणि भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत.

दरम्यान,  एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत केंद्रीय बैठक बोलावली. या बैठकीनंतर शहांनी ‘एनडीए’च्या नेत्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-देशभरातून विविध संस्थांचे एक्झिट पोल; त्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

-भाजपला सत्ता मिळणार नाही; या एक्झिट पोलचा सर्वात धक्कादायक अंदाज

-विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

-काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

गिरीश महाजनांचं आव्हान नाना पटोलेंनी स्वीकारले; त्यावर महाजनांनी लावली शर्यत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या