बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आरएसएस प्रमुख म्हणजे मुंह में राम, बगल में छुरी आहेत’; मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मायावती भडकल्या

नवी दिल्ली |  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच हिंदु- मुसलमानांमध्ये मतभेद नाहीत, हिंदु- मुसलमान एक आहेत, असं वक्तव्य केलं आहे. भागवतांच्या या वक्तव्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी मोहन भागवतांवर टीका केली आहे. अशातच आता बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांनी देखील मोहन भागवतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

आरएसएस प्रमुख म्हणजे मुंह में राम, बगल में छुरी आहेत, अशी टीका मायावती यांनी केली आहे. तसेच केंद्र व उत्तर प्रदेशसह देशातील ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार कार्यरत आहेत, तेथील बहुतेक लोक भारतीय संविधानातील मानवतावादी हेतूचे पालन करण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंडावर चालत आहेत, ही एक सामान्य चर्चा आहे.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी काल आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भारतातील सर्व धर्माच्या लोकांचे डीएनए एकच असल्याचं म्हटलं होतं. आरएसएस प्रमुखांनी म्हटलेली ही गोष्ट सहजपणे कोणाच्याही गळ्याखाली जाणारी नाही. आरएसएस, भाजपा कंपनी आणि त्यांची सरकारे यांच्या लोकांच्या बोलण्यात आणि कृतीत फार फरक आहे, असं देखील मायावती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाही एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेदाभेद करणं चुकीचं आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून मुस्लिमांना आपली ओळख संपवण्याची किंवा नष्ट करण्याची काहीच गरज नाही. मुळातच हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत, असं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

“उज्ज्वला गॅस योजनेसाठी इम्पेरीकल डाटा वापरता मग ओबीसींसाठी का दिला जात नाही”

“भाजप-शिवसेनेचं नातं आमीर खान आणि किरण राव यांच्यासारखं”

“31 जूलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत केलेली घोषणा फसवी आहे”

12 आमदारांवर झालेल्या कारवाईनंतर भाजपची बैठक; बैठकीकडे सर्वांचं लक्ष

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More