नागपूर महाराष्ट्र

काही शक्तींकडून भय आणि द्वेष पसरवण्याचा खेळ सुरू आहे- मोहन भागवत

Loading...

नागपूर | संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना काही शक्तींकडून जनतेच्या मनामध्ये द्वेष आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे. ‘भारत तेरे तुकडो होंगे’ असे कुविचार पसरवणाऱ्यांचं हे कार्य आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

मोहन भागवत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या काळात कार्यक्रम घेणे शक्य नाही. मात्र सेवा कार्य हेच आपलं मुख्य काम आहे, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

भीती आणि द्वेषाच्या राजकारणाला बळी न पडता कुठल्या एका समाजाला दूर करू नका. 130 कोटींचा हा संपूर्ण समाज आमचे बंधू आहेत, या भावनेतून सेवा करा, असं आवाहन मोहन भागवत यांनी केलं आहे.

दरम्यान, संकट काळात आपल्या मनात भीती किंवा द्वेषाचा विचार न येऊ देता सकारात्मकतेने या सर्व संकटाला समोर जाणं आवश्यक आहे, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरोधातील लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश देईल- देवेंद्र फडणवीस

वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू; आज पुण्यात किती रुग्ण आढळले?

21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल’; संशोधकांचा दावा

राज्यात आज आढळले कोरोनाचे नवीन ४४० नवे रुग्ण; पाहा तुमच्या जिल्ह्यात किती?

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या