Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत. आरएसएसची स्थापना ही दसऱ्याच्या दिवशी झाली होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी दसऱ्याला नागपूर येथे संघ मुख्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आज सरसंघचालक मोहन भागवत यांचं मुख्यालयात भाषण झालं. यावेळी त्यांनी भारताची वाटचाल आणि जागतिक स्तरावरील आव्हाने याबाबत भाष्य केलं. तसेच, सर्व हिंदूंना मोठं आवाहन देखील केलं. (Mohan Bhagwat)
बांगलादेशमधील परिस्थितीबाबतही भागवत यांनी भाष्य केलं. “एका आव्हानाचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. कारण ते आव्हान फक्त संघ किंवा हिंदू समाजासमोर नाहीये. फक्त भारतासमोरही हे आव्हान नाही. जगभरात हे आव्हान निर्माण होत आहे. ते आपण समजून घ्यायला हवं. भारत पुढे जाऊ नये, अशी इच्छाही अनेक देशांची आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या चाली खेळतीलच. तसं होतही आहे. आजतागायत भारत सोडून इतर कोणत्या देशानं जगाच्या विकासाचा मार्ग निवडलेला नाही. आपण ते करतो”, असं मोहन भागवत म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
“आपल्या शेजारी काय घडतंय?, बांगलादेश येथे काय घडलं? त्याची काही करणे असतील. पण, एवढा मोठा विद्ध्वंस तेवढ्यानं होत नाही. दोन गोष्टी स्पष्ट आहेत. त्या विद्ध्वंसामुळे हिंदू समाजावर अत्याचाराच्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली. कुठे काही गडबड झाली की दुर्बलांवर आपला राग काढण्याची कट्टरपंथी वृत्ती आहे. ही वृत्ती जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत हिंदूच नव्हे, सर्वच अल्पसंख्यांकांच्या डोक्यावर ही तलवार टांगती राहणार आहे”, असं भागवत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “हिंदूंच्या हे लक्षात आलं पाहिजे की, दुर्बल राहणं अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत याचा अर्थ आपण अत्याचाराला निमंत्रण देत आहोत. मग त्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही. आपण दुर्बल आहोत हेच निमित्त आहे. त्यामुळे जिथे आहात, तिथे संघटित राहा. कुणाशी शत्रुत्व करू नका. हिंसा करू नका. पण याचा अर्थ दुर्बल राहणं नाही. हे आपल्याला करावंच लागेल”, असं आवाहन देखील मोहन भागवत यांनी केलं. (Mohan Bhagwat)
समाजा समाजात, जाती-जाती, धर्मा-धर्मात वेगळपणा दाखवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. मुद्दामहून संघर्ष निर्माण करण्यात येत आहे. हा धोका ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच मोहन भागवत यांनी बांगलादेशातील हिंदूंना मदत करण्याचे आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. (Mohan Bhagwat)
News Title – RSS Chief Mohan Bhagwat appeal to Hindus
महत्त्वाच्या बातम्या-
दसऱ्याच्या मुहूर्तालाच सोनं महागलं, जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर!
दसऱ्यावर पावसाचं सावट, आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार!
महिलांना पार्ट टाइम जॉब, 11 हजार पगार देणार; महायुती सरकारची मोठी घोषणा
दसऱ्याला ‘या’ राशींवर होणार धन-सुखाची बरसात, मिळणार अमाप पैसा!
लाडक्या बहीण योजनेत मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज