बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ते एक बंद षडयंत्रच होतं”, मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गेल्या काही दिवसांपासून आपलं प्रखर मत मांडताना दिसत आहेत. अशातच एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान आरएसएस प्रमुखांनी 1947 साली झालेल्या देशाच्या फाळणीवर भाष्य केलं आहे. (RSS chief Mohan Bhagwat commented on the partition of the country)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या फाळणीचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशाची फाळणी हे नियोजित आणि बंद षडयंत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर फाळणीची वेदना फाळणी संपल्यानंतरच संपेल, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.

मोहन भागवत यांनी नोएडा येथे लेखक कृष्णानंद सागर यांच्या ‘फाळणी कालिन भारत के साक्षी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने देशाची फाळणी ही एक असह्य वेदना असल्याचं मोहन भागवत म्हणाले आहेत. हा काही घोषणांचा विषय नाही, तेव्हाही घोषणा दिल्या गेल्या पण फाळणी झाली. ही विचार करण्यासारखी गोष्ट असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

भारत हा जमिनीचा तुकडा नसून आपली मातृभूमी आहे. फाळणी दूर झाली तरच आपण जगाला काही देऊ शकू. त्याचबरोबर देशाची फाळणी हा राजकारणाचा विषय नसून आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचेही भागवत म्हणाले. यातून कोणालाच आनंद झाला नाही. परकेपणाच्या प्रवृत्तीमुळे देशाची फाळणी झाली आणि त्याच्या वेदनादायक इतिहासाची पुनरावृत्ती आपण होऊ देणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More