लंडन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अरब देशातील ‘मुस्लिम ब्रदरहुड’ सारखा आहे, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. ते लंडनमध्ये बोलत होते.
पाकिस्तानबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ठोस धोरणे नाहीत. मोदी डोकलाम प्रश्नाकडे इव्हेंटप्रमाणे बघतात, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. तसंच डोकलाममध्ये आजही चिनी सैन्य आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, ‘मुस्लिम ब्रदरहुड’ला अरब देशांनी दहशतवादी संघटना घोषीत केलं आहे. या संघटनेची संकल्पना आणि संघाची संकल्पना मिळतीजुळती असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा झटका; रेंजरोव्हरचा टायर फुटला!
-सरकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार; मतदार यादीत पाॅर्नस्टार, हत्ती, कबुतर!
-मराठा समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
-नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं ते गुपित अखेर बाहेर!
-लवकरच शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकेल आणि खरीखुरी शिवशाही येईल!