बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार आहेत”

नवी दिल्ली | आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे मीर जाफर आणि जयचंद यांच्यासारखेच गद्दार आहेत, अशी जळजळीत टीका टीका आरएसएसचे इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू, अभिनेता नसीरुद्दीन शहा आणि अमिर खान यांंच्यावर केली आहे. 

यांच्यासारख्यांची देशाला गरज नसून दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या विचारांची देशाला गरज आहे, असंही इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे.

नवज्योतसिंह, आमीर आणि नसीरुद्दीन हे चांगले अभिनेते असू शकतात पण ते सन्मानास पात्र नाहीत. भारतात कसाब, याकूब आणि इशरत यांसारख्या मुसलमानांची गरज नाही. कलामांनी दाखवलेल्या मार्गाने चालणाऱ्यांची गरज आहे, असंंही कुमार यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, राम मंदिर बांधणीला लागलेल्या विलंबास काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

“ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्याने कार्यवाही करावी”

ऐका मोहम्मद शमीचं इंग्लिश… ऐकून तुम्हीही हसाल!

-…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक

-2009 सारखचं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दणदणीत यश मिळेल! 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More