सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं; संघाचा मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला

मुंबई | सध्या सत्तेत असणाऱ्यांकडून कसलीही अपेक्षा करणं व्यर्थ आहे, अशी टीका संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केली आहे. ते मुंबईत आयोजित भारत विकास परिषदेत बोलत होते. 

देशातील धार्मिक बाबींमध्ये सरकार आणि न्यायालयाच्या वाढणाऱ्या हस्तक्षेपावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. धर्माचे वाद न्यायालयात जाणे ही बाब दुर्दैवी अाहे. न्यायव्यवस्थेने धर्मांबाबत निर्णय घेणे योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं. 

तुमच्याकडे सत्ता नसेल तर अशा गोष्टींवर निर्णय घेता येत नाही, हे मान्य करु शकतो. मात्र, हल्ली सत्तेत असलेल्यांकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, समाजात सत्तेच्या जोरावर परिवर्तन आणता येत नाही. तर त्यासाठी चांगल्या सामाजिक रचनेची गरज असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo मुळे इम्रान हाश्मी सावध; सुरक्षेसाठी करतोय ‘अशी’ तयारी

-राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा… सत्यजित तांबे!

-विराट म्हणतोय, “भारतात बनवलेल्या बॉलनं खेळायला नको!”

-कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही- मुख्यमंत्री

-राष्ट्रवादीने भाजपवर आरोप केले, मात्र आता आव्हान स्वीकारणार का?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा