काँग्रेस कार्यालयात राष्ट्रगीताऐवजी संघाची प्रार्थना वाजली?

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रगीताऐवजी संघाची प्रार्थना वाजल्याची चर्चा आहे. काँग्रेसनं ही चर्चा फेटाळली आहे, मात्र ‘तरुण भारत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केलंय. 

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला टिळक भवन कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी ध्वजाला मानवंदना देताना राष्ट्रगीताऐवजी ‘नमस्ते सदा वत्सले’चे सूर स्पीकरमधून निघाल्याचं या वृत्तात म्हटलंय.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी असा कुठलाच प्रकार झाला नसल्याचं म्हटलंय. तसेच सदर वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलंय.