RSS | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिर्डीतील (Shirdi) पक्षाच्या अधिवेशनात (Convention) भाजप मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा (Expectations) सांगितल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही दोन दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai) महायुतीचे (Mahayuti) मंत्री (Ministers) आणि आमदारांचा (MLAs) क्लास घेतला होता. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) भाजप मंत्र्यांसाठी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करत आहे. या बैठकीत संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी (Senior Functionaries) भाजप मंत्र्यांना मार्गदर्शन (Guidance) करणार आहेत.
बैठकीचा अजेंडा (Agenda)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष (Revenue Minister and State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे दोन्ही दिवस बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्तेत आल्यानंतर संघ आणि भाजपचे मंत्री यांची ही पहिलीच बैठक असेल. संघाच्या येथील यशवंत भवनात (Yashwant Bhavan) १८ आणि १९ जानेवारीला दिवसभर ही बैठक होणार आहे.
महायुती सरकारकडून संघाच्या अपेक्षा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “संघाकडून मंत्र्यांनी कसा कारभार करावा याबाबतच्या अपेक्षा या बैठकीत सांगितल्या जातील. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असताना रा. स्व. संघाने (RSS) भाजपच्या मंत्र्यांची अशीच एक बैठक मुंबईत घेतली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दहाच कॅबिनेट मंत्री (Cabinet Ministers) होते. यावेळी भाजपचे १७ मंत्री आणि ३ राज्यमंत्री (Ministers of State) आहेत. या राज्यमंत्र्यांचे कॅबिनेट मंत्री हे शिंदेसेना (Shinde Sena) किंवा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आहेत. अशावेळी त्या खात्यांमधील (Departments) आपला अजेंडा राज्यमंत्र्यांमार्फत पुढे नेण्याचा संघाचा प्रयत्न असेल.”
निवडक मंत्र्यांकडून मोठी अपेक्षा
“कामगार (Labor), उच्च व तंत्रशिक्षण (Higher and Technical Education), पशुसंवर्धन (Animal Husbandry), आदिवासी विकास (Tribal Development), ग्रामविकास (Rural Development), वनविभागाशी (Forest Department) संबंधित विषयांवर विशेषत्वाने संघाची भूमिका (Role) आणि अपेक्षा याबाबत मंत्र्यांना अवगत केले जाईल,” अशी माहिती आहे.
मंत्र्यांना कानमंत्र
“मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सरकारचा कारभार पारदर्शक (Transparent) आणि प्रामाणिक (Honest) असेल असे आधीच म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, बडेजाव (Show Off) नको, साधे राहा, असे मंत्र्यांना बजावले आहे. याच धर्तीवर संघ मंत्र्यांना उद्बोधन करेल,” असे मानले जात आहे. (RSS)
Title : RSS to hold a meeting with BJP Ministers in Mumbai
महत्वाच्या बातम्या-
इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची आकडेवारी समोर, बघून तुम्हालाही धक्का बसेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जाणार!
जेल की बेल?, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी, 23 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू
सैफवरील हल्ल्यावर बोलताना अभिनेत्रीने दाखवलं हिऱ्याचं घड्याळ, नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं