बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबई सागा’ चित्रपटात RSSची बदनामी?; चित्रपटातील ‘या’ दृष्यांवर संघाचा आक्षेप

मुंबई | अभिनेता जॉन अब्राहिम यांचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अॅमेझाॅन प्राईम या ओटीटी प्लाॅटफाॅमवर हा चित्रपट 19 मार्चला प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात 90च्या दशकातल्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. अभिनेता जाॅन अब्राहिम, सुनिल शेट्टी, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, रोणित राॅय, इम्रान हाशमी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. आता या चित्रपटावरून नवा वाद समोर आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी मुंबई सागा चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय गुप्ता आणि चित्रपटाशी संबंधित इतरांच्या नावाने नोटीस पाठवली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. या चित्रपटात गँगस्टर आणि पोलिसांमधला संघर्ष दाखवण्यात आला आहे.

सिनेमातील एका दृश्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात असलेल्या व्यक्तींचा फोटो दाखवला आहे. त्यापैकी एक जण भाऊ नावाच्या व्यक्तिरेखेच्या सेनेचा सदस्य असल्याचं त्यात दाखवलं आहे. या सेनेतील व्यक्ती मुंबई पोलीस दलात घुसखोरी करुन महत्त्वाची पदे काबीज करत असल्याचं त्यात दाखवण्यात आलंं आहे. तर महेश मांजरेकर यांची भूमिकेत बाळासाहेब ठाकरे यांची छाप सोडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे.

दरम्यान, भाऊ नावाच्या व्यक्तिरेखेमुळे आणि चित्रपटातील दृश्यामुळे संघाची प्रतिमा मलीन केली जात असून त्याने संघ स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या आहेत, असं भिंगार्डे यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटातील बदनामीकारण दृष्य काढून टाकावीत आणि जाहीर माफी मागावी, अशी मागणी भिंगार्डे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

घोड्यावर उभं राहून करत होता स्टंट अन्…, पाहा व्हिडीओ

लैंगिक शक्ती कशी वाढवाल?; ‘या’ अभिनेत्यानं यूट्यूबवर शेअर केला व्हिडीओ

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात टाळेबंदी, संभाजीराजेंना मोठा धक्का!

भर मंडपात नवरीने केलं असं काही की…; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

हॅाटेलच्या रुममधून येत होता पत्नीचा आवाज, मात्र पतीनं पकडताच केला धक्कादायक खुलासा

षटकारांचा बादशाह मात्र अजूनही संधी नाही, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं दिली खेळ सोडण्याची धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More