बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे काही राज्यांत कडक निर्बंध लावले जात आहेत. आता महाराष्ट्रातही प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.

आता महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर चाचणी दाखवणं बंधनकारक असणार आहे. कोरोना संक्रमणाचा प्रभाव अजूनही कायम असल्यामुळं राज्य सरकारनं ही अट घातलेली आहे. कोरोना आटोक्यात येत असतानाच आता राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटनंही डोकं वर काढलं आहे.

संसर्ग थोपवण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग करुन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या देशात अनेक प्रकारे संशयित रुग्णांची चाचणी करण्यात येतेय. त्यामुळे आता आरटी-पीसीआर चाचणी करणं अनिवार्य झालं आहे. या चाचणीमध्ये कोरोना विषाणूच्या आरएनएची चाचणी केली जाते. या चाचणीदरम्यान शरीरातील वेगवेगळ्या भागांचे नमुने घ्यावे लागतात. सध्यातरी चाचणी करताना नाक आणि घशातून नमुने घेतले जातायेत.

दरम्यान, सध्या लसीकरणावर भर दिला जात असताना पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत 50 टक्के लोकांचं लसीकरण झालं असून अजूनही अनेकांचं लसीकरण राहिलं आहे. त्यामुळे आता तिसऱ्या संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी सरकारकडून योग्य ती उपाययोजना केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको पण मी बोलणार, केंद्र सरकारने…”

‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

…नाहीतर पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या अधिक माहिती

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार

दिया मिर्झानं पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More