बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

मुंबई | देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्याच कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली. राज्य सरकारने सहा राज्यांना अति संवेदनशील घोषित केलं असून या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहेत.  या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना त्या आधी 48 तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना किंवा रेल्वेस्थानकावर आल्यावर  निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांना राज्यात प्रवेश करता येणार नसल्याचं कळतंय.

दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात 68 हजार 631 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 45 हजार 654 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर गेल्या चोवीस तासांत 503 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले असले तरी सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाहीये.

थोडक्यात बातम्या- 

तोंडात कोरोनाचे जंतू टाकतो म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

पंजाबच्या गोलंंदाजांवर गब्बर दहाडला; दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय- हेमंत ढोमे

देशाला लागलेली कोरोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण- तेजस्विनी पंडीत

पुण्यात बापानं 2 पोरींवर ट्रक चढवला अन् स्वतःलाही संपवलं, कारण अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More