मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटली, ३ जणांचा मृत्यू

रत्नागिरी | मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे वळणावर खासगी बस उलटलीय. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय, तर १५ प्रवासी जखमी झालेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं आज पहाटे हा अपघात घडला.

विशाल ट्रॅव्हल्सची ही बस परेलहून मालवणला जात होती. अपघातावेळी बसमध्ये ४७ प्रवासी होते, यातील जखमींवर सध्या डेरवणच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या