बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील प्रवाश्यांना कर्नाटकमध्ये जायचं असल्यास ‘या’ नियमाचं करावं लागणार पालन

बंगळुरू | देशभरात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असताना दुसऱ्या लाटेतील कोरोना हळू हळू आटोक्यात येत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात आता कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरीएंटने डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकारचे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असताना आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी कर्नाटक सरकारने नवे नियम लागू केले आहेत.

दरम्यान, कर्नाटक सरकारने जाहीर केल्या प्रमाणे आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करू इच्छित असणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाश्यांना कोरोनाचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट जवळ बाळगणं बंधनकारक असणार आहे. कर्नाटक सरकारने या संबंधी सूचना जाहीर केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या लोकांना या नियमाच काटेकोर पालन करावं लागणार आहे.

कर्नाटकच्या सर्व रेल्वे स्टेशनवर प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. तसेच येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी 72 तासांपूर्वी निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. ज्या प्रवाशांचा अहवाल नसेल आणि जर त्यांची चाचणी केल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना तात्काळ कोरोना सेंटरमध्ये हलवण्यात येणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच कर्नाटकने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण धोका अद्याप टळलेला नाही, अजूनही संकट डोक्यावर घोंगावत असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

 

 

 

 

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More