बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोकणात पावसाचा रुद्रावतार, चिपळूण शहर पाण्यात…

रत्नागिरी | आज राज्यभर पावसाने जोरदार बॅटींग चालू आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने कोकण भागात चांगलाचा तडाखा लावून धरला आहे. कोकणातील काही भागात पाण्याचा वेग वाढला असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील वाशिष्टी नदीला पूर आला आहे. पूराचं पाणी शहरात शिरलं आहे. पुराच्या पाण्याने सर्व शहाराला वेढा पडला आहे. त्यामुळे चिपळूणला मदत करणंही अवघड झालं आहे. कोकणातील रेल्वे सेवाही चिपळुणपर्यंत सुरू आहेत . त्यामुळे इतर रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत.

वाशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलं आहे. नदीकाठच्या सुकाई मंदीरातही पाणी आहे. एकंदरित फोटोंवरून दिसून येईल की पाण्याची पातळी हा वाढू लागली आहे.

दरम्यान, पाणी पातळी वाढल्यामुळे चिपळूण शहर पुर्णपणे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. चिपळूणसाठी तातडीने मदत पाठवण्यात यावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पुण्यासाठी काहीच केलं नाही त्यांचे बॅनर ‘विकासपुरूष’ म्हणून झळकतात’; पवारांचा फडणवीसांवर निशाणा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका!

“मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन”; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा!

पॉर्न प्रकरणात मोठी बातमी! राज कुंद्राने क्राईम ब्रांचला दिली इतक्या लाखांची लाच???

नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात, चार मित्रांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More